बीड - श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे हरिकीर्तनास प्रचंड गर्दी
बीड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। विसाव्या शतकातील बहह्मयोगी महान संत ह.भ.प.वै. किसन बाबा महाराज यांच्या त्यागातून व कृपाशीर्वादातून श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे वैभव दिसत आहे. शांतीब्रह्म नावाप्रमाणे सदैवस्थित प्रज्ञा असणारे व भगवंताच्या नामामध्ये लीन अस
हरी कीर्तनास प्रचंड गर्दी


बीड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। विसाव्या शतकातील बहह्मयोगी महान संत ह.भ.प.वै. किसन बाबा महाराज यांच्या त्यागातून व कृपाशीर्वादातून श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे वैभव दिसत आहे. शांतीब्रह्म नावाप्रमाणे सदैवस्थित प्रज्ञा असणारे व भगवंताच्या नामामध्ये लीन असणारे स्थितारज्ञ असे शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्याकडे पाहिलं की गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबाच्या रूपाने - नवनारायणाचे दर्शन घड़तं असे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प. विशाल महाराज खोले म्हणाले.

वारकरी संप्रदाय हा नाथ परंपरेतून निर्माण आलेला आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या आजोबाना गोरक्षनाथांनी समाधी दिली व गहिनीनाथांनी निवृतीनाथांना दीक्षा दिली वालूनच वारकरी संप्रदायाचा पाया रचला गेला. नाथ संप्रदायाचे वारकरी संप्रदायावर अनंत उपकार आणि संस्कार आहेत. नवनाथांनी जे त्यागातून जनकल्याणाच काम केलं त्याचा वारसा पुढे वारकरी संप्रदायातून संत मंडळींनी चालकाला असे खोले महाराज म्हणाले.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे विवेचन करताना खोले महाराज पुढे म्हणाले की, मनुष्य आयुष्यात लहान असताना आई समोर नाचतो, तरुणपणी मायामोहाने पत्नी समोर नाचतो आणि म्हातारपणी मुलांसमोरून नाचत असतो.तरुण्याने आयुष्यामध्ये पत्नीच्या मुलाच्या तालावर नाचण्या ऐवजी मनुभ्याने परमालाच्या नामस्मरणात नाचाये त्यामुळे आयुष्याचे कल्याण होतं. मनुष्याने हरितकामात हरिकीर्तनात बारीमध्ये पांडुरंगाच्या दारामध्ये, साधुसंतांच्या सानिध्यामध्ये हरिपाठ मध्ये, हरिनामात देग होऊन नावाचे परंतु मनुष्याच्या जीवनाची विना अशी आहे की मनुष्य बायकोच्या तालावरनाचतो, मनुष्य दारू पिऊन नावतो, मनुष्य ने वाध्या तालावर नाचतो आणि मनुष्य आयुष्यभर संसारी मोहमावेच्या तालावर नाचतो याच्यामध्ये आपले आयुष्य वाया घालवतो माणसाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर मनुष्याने साधुसंतांच्या संगतीमध्ये, हरिनामामध्ये, कीर्तनामध्ये नाचावं आणि हरिनाम हेच माणसाला वाचू शकते असे ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी अभंग विवेचनांमध्ये हठले अभंग विवेचन करताना ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी संतश्रेष्ठ मीराबाई यांचे उदाहरण देऊन तसेच नृत्याङ्ग विठाबाई यांचे उदाहरण भाविक भक्तांना दिले व हरी नामाची महती सांगितली. श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे प्रचंड भाविक भकांच्या गर्दीमध्ये हरिकीर्तन संपत्र झाले यावेळी टाळकरी, माळकरी, भजनी मंडळी, गायनाचार्य वादंगाचार्य, मृदंगाचार्य, यांच्यासह भाविक भांच्या प्रबंड ह.भ.प.विशाल महाराज खोले यांचे कीर्तन संपत्र झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande