चौकशी समितीचे अध्यक्ष गायब, रुग्णालय वाऱ्यावर; आरोग्य सेवा आयुक्तांविरोधात अमरावतीत तुफान घोषणाबाजी
अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.) अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील ३ चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर आता संतापाचा उद्रेक झाला आहे! या भीषण दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती गठी
चौकशी समितीचे अध्यक्ष गायब, रुग्णालय वाऱ्यावर!';  आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्याविरोधात अमरावतीत तुफान घोषणाबाजी...


अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.)

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील ३ चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर आता संतापाचा उद्रेक झाला आहे! या भीषण दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती गठीत केली आहे. मात्र, चौकशी समितीचे अध्यक्ष असूनही आयुक्त संजय काटकर यांनी अद्याप जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली नसल्याने त्यांच्याविरोधात रुग्णालयाच्या परिसरातच जोरदार निदर्शने आणि तुफान घोषणाबाजी सुरू झाली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय परिसरात आक्रमक पवित्रा घेत आयुक्त संजय काटकर आणि प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला. एवढी मोठी भीषण दुर्घटना घडली, ३ निष्पाप बाळांचा बळी गेला आणि चौकशी समितीचे अध्यक्षच इथे फिरकायला तयार नाहीत! असा घणाघाती आरोप करत आमदार गजानन लवटे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande