लातूर - तलावाच्या जमिनीवर खाजगी कंपनीने केलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्याची मागणी
लातूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। जळकोट तालुक्यातील तिरुका येथील साठवण तलाव, पाझर तलाव आणि गाव तलावासाठी संपादित केलेल्या शासकीय जमिनीवर आवादा सन एनर्जी प्रा. लि. कंपनीने अतिक्रमण करत सोलार प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीसह शेतक
मागणी


लातूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। जळकोट तालुक्यातील तिरुका येथील साठवण तलाव, पाझर तलाव आणि गाव तलावासाठी संपादित केलेल्या शासकीय जमिनीवर आवादा सन एनर्जी प्रा. लि. कंपनीने अतिक्रमण करत सोलार प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीसह शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या वहीवाटीचा शेतरस्ताही अडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची चौकशी करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी ग्रामपंचायतीने विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे, गावातील साठवण तलाव, पाझर तलाव आणि गाव तलावासाठी संपादित झालेली शासकीय जमीन कंपनीच्या सोलार प्रकल्पाच्या कामासाठी वापरली जात आहे. तलाव परिसरातील जमीन तसेच शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

तलावाच्या परिसरात जनावरांना पाणी पाजण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पूर्वीपासून वापरात असलेले रस्ते आहेत. या रस्त्यांवर अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची वाहतूक आणि शेतीची कामे प्रभावित होत आहेत. या प्रकरणी जळकोट तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार राजेश लांडगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दि. १५ ऑगस्ट रोजी लातूर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले अखेर विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. सरपंच सुनीता खटके उपसरपंच मारोती पांडे, ग्रामविकास अधिकारी एस. एम. पाटील यांच्यासह सुमारे १०० शेतकऱ्यांच्या निवेदनाव स्वाक्षऱ्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande