
परभणी, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। येथील महात्मा फुले विद्यालय, भीमनगर शाखेत ईद ए मिलाद निमित्त मनपा समाजकल्याण सभापती डॉ. राजेश रणखांबे यांच्यातर्फे होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक लखनसिंह जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा समाजकल्याण सभापती डॉ. राजेश रणखांबे, मनपा सदस्य विकास राजापुरे, पर्यवेक्षक शिवाजीराव गणपुरकर, कथाकार राजेंद्र गहाळ, अंकुश मोगरे, मगदूम शेख, प्रदिप चव्हाण, अमोल क्षीरसागर, भारत खंदारे,प्रदुम्न शिंदे कार्यालयीन अधीक्षक आकाश परसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. ईद ए मिलाद निमित्त विद्यालयातील कु.अफरीन शेख जावेद, कु. अल्फिया शेख मगदूम, कु. अलिना सय्यद निजाम,कु. सायमा शेख सलीम, कु.महेक गौस खान,शेख जलाल शेख समद या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis