
छत्रपती संभाजीनगर, 26 ऑगस्ट (हिं.स.) : बदनापूर तालुक्यातील देवगाव येथे शेतकरी संवाद दौऱ्याच्या निमित्ताने शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या विविध अडचणी, समस्या, अपेक्षा आणि मागण्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी गावातील स्मशानभूमी बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले.
शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या कष्टाला बळ देण्यासाठी शासनाच्या विविध योजना आणि विकासकामांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या हितासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाहीही देण्यात आली.
शेतकरी संवादादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी विविध समस्या आणि मागण्या मांडल्या. त्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
गावातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासोबतच शेतकरी बांधवांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विकासकामांना गती देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. स्मशानभूमीच्या बांधकामामुळे गावातील नागरिकांची महत्त्वाची गरज पूर्ण होणार असल्याचेही सांगण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा जालना माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, पद्माकर जऱ्हाड, भगवान मात्रे, राजेंद्र बापू जऱ्हाड, भगवान बारगाजे, तहसीलदार हेमंत तायडे, जिल्हा परिषद उपअभियंता लक्ष्मण राऊत, सरपंच विनोद मगरे, बाबासाहेब कऱ्हाळे, रवींद्र बोचरे, गणेश कोल्हे, गजानन काटकर, सुधीर पवार, अशोक निंबाळकर, पुरुषोत्तम जोशी, जितेंद्र कुलकर्णी, भरत गारखेडे, विठ्ठल राठोड, ईश्वर जाधव, कमलाकर कोल्हे, जुबेर पटेल, अमोल चव्हाण, भास्कर कोल्हे यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis