परभणी - राष्ट्रवादीचे माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह पदाधिकारी शिवसेनेत करणार प्रवेश
परभणी, 26 ऑगस्ट (हिं.स.)। परभणी शहराचे प्रथम महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्यासह शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प
परभणी - राष्ट्रवादीचे माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह पदाधिकारी शिवसेनेत करणार प्रवेश


परभणी, 26 ऑगस्ट (हिं.स.)। परभणी शहराचे प्रथम महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्यासह शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख यांनी आपल्या निर्णयाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी खासदार संजय जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रताप देशमुख म्हणाले, ‘‘स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण आतापर्यंत काम केले. त्यांनी विविध पदांवर काम करण्याची संधी देऊन विश्वास दाखविला. मात्र, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी धडाडीने काम करणारे नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अजितदादांसारखेच गुण दिसतात. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.’’परभणी शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढे शिवसेनेच्या माध्यमातून सक्रियपणे काम करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार संजय जाधव म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दि. ३० ऑगस्ट रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर शेतकरी व युवकांचा मेळावा होत असून, या मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेते व कार्यकर्ते यावेळी शिवसेनेत सहभागी होणार आहेत. ‘‘शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाला मान्यता मिळवून देण्यात परभणी जिल्ह्याचे योगदान महत्त्वाचे आहे. परभणी जिल्हा आजपर्यंत शिवसेनेच्या भक्कम पाठीशी उभा राहिला असून, यापुढेही संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे,’’ असे खासदार जाधव यांनी सांगितले.पत्रकार परिषदेस रामेश्वर आवरगंड, सुरेंद्र रोडगे, शंकर भागवत, माजी नगरसेवक राजू शिंदे, पंजाब पतंगे, विजय धरणे, सतीश नगरसाळे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande