
लातूर, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। पंचायत समिती चाकूर येथे विकसित भारत- रोजगार व आजीविका हमी अभियान ग्रामीण कायदा २०२५ अंतर्गत एकदिवसीय तालुकास्तरीय पंचसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार हे सहभागी झाले होते.
या सर्वाना विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी अभियान ग्रामीण कायदा २०२५ या योजनेची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आले. तज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रा. रवींद्र इंगोले यांनी मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद लातूरचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे हे होते. या कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती जयश्री नागरगोजे, उपसभापती भुजंग शिंदे, जिल्हा परिषद सदस्या उषा सोनकांबळे, पंचायत समिती सदस्य संतोष कलवले, गजानन होनराव आणि सर्व सदस्य उपस्थित होते. गटविकास अधिकारी संतोष माने, सहाय्यक गट विकास अधिकारी बाळासाहेब पाटील, उपअभियंता (बांधकाम) कोळे, उपअभियंता (लपा) येलाले, गटशिक्षणाधिकारी श्रीमती मंदोदरी वाकडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती विद्या लोमटे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तावरे, तालुका आरोग्य अधिकारी होळे सर्व सरपंच आणि कर्मचारी व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis