राखीच्या किमती वाढल्या; मात्र बहिणींच्या उत्साहाला ब्रेक नाही
रायगड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन सणाला अवघे काही दिवस उरले असताना बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. यंदा राख्यांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी बहिणींचा उत्साह मात्र कायम असून, राखी खर
Rakhi prices have risen, yet there is no dampening of sisters' enthusiasm.


रायगड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन सणाला अवघे काही दिवस उरले असताना बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. यंदा राख्यांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी बहिणींचा उत्साह मात्र कायम असून, राखी खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे.

बाजारात पारंपरिक राख्यांसह आकर्षक डिझाइनच्या रंगीबेरंगी राख्या, कार्टून कॅरेक्टरच्या राख्या, मोत्यांच्या राख्या, चंदनाच्या तसेच स्टायलिश राख्यांना मागणी आहे. लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक राख्या उपलब्ध असून, भावंडांसाठी खास कॉम्बो पॅकही बाजारात दाखल झाले आहेत. राख्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. साध्या राख्यांपासून आकर्षक आणि डिझायनर राख्यांपर्यंत विविध दरांमध्ये राख्या उपलब्ध आहेत. मात्र, भाव वाढले असले तरी बहिणी आपल्या भावासाठी आवडीची राखी घेण्यासाठी उत्साहाने खरेदी करताना दिसत आहेत.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मिठाई, भेटवस्तू, कपडे आणि सजावटीच्या साहित्याच्या दुकानांमध्येही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. अनेकांनी आपल्या भावासाठी खास भेटवस्तू घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महागाईचा परिणाम राख्यांच्या किमतीवर झाला असला तरी भावाच्या मनगटावर प्रेमाचा धागा बांधण्याची ओढ अधिक असल्याने राखीच्या किमतीपेक्षा नात्याला महत्त्व दिले जात आहे. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी बाजारातील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande