
छत्रपती संभाजीनगर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। पैठण शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने खरेदी करण्यात आलेल्या नूतन सक्शन मशीनचे लोकार्पण खासदार संदिपान भुमरे शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे सक्शन मशीन सांडपाणी, गटारे, नाले तसेच साचलेला गाळ व घाण प्रभावीपणे बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक कार्यक्षम होण्यासोबतच नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच पावसाळ्यात किंवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठीही या मशीनचा प्रभावी उपयोग होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis