एटीएस कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून ९० लाखांची फसवणूक
नाशिक, 29 ऑगस्ट (हिं.स.)। एटीएसमधून मुंबई पोलीस बोलत असल्याचे भासवून आतंकवाद्याशी संबंध असल्याचे सांगून मनी लॉण्डरिंगच्या रकमेची चौकशी करण्याची भीती दाखवून तक्रारदारास ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, क
एटीएस कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून ९० लाखांची फसवणूक


नाशिक, 29 ऑगस्ट (हिं.स.)। एटीएसमधून मुंबई पोलीस बोलत असल्याचे भासवून आतंकवाद्याशी संबंध असल्याचे सांगून मनी लॉण्डरिंगच्या रकमेची चौकशी करण्याची भीती दाखवून तक्रारदारास ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की तक्रारदार हे गंगापूर रोड, शंकरनगर येथे राहतात. त्यांना व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांकावरून एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधून चॅटिंग करताना एटीएसमधून मुंबई पोलीस बोलत असल्याचे भासविले. फिर्यादी यांना आधार कार्डावरून - जम्मू येथे एचएसबीसी बँकेत बँक खाते उघडून त्याद्वारे आतंकवादी आदिल गौरी याने ते खाते मनी लॉण्डरिंग प्रकरणात वापरले असून, त्याद्वारे तुमचादेखील सहभाग आहे, असे फिर्यादीला सांगितले. त्यामुळे तुम्हाला तुमचे आर्थिक तपशील व स्थावर मालमत्तेची माहिती एटीएसला द्यावी लागेल. तुमच्या बँक खात्यात जमा असलेली रक्कम रिझर्व्ह बँकेमार्फत चौकशी करावयाची असल्याचे सांगितले, तसेच चॅट करणाऱ्या व्यक्तीने आम्ही सांगितल्याप्रमाणे बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने ८९ लाख ९९ हजार ७११ रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यावर वर्ग केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीशी संपर्क न साधता आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दि. १७ ते २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande