परभणीत २३ लाखांची केबल वायर चोरी उघडकीस, दोघे आरोपी ताब्यात
परभणी, 29 ऑगस्ट (हिं.स.)। चोरीचे केबल वायर घेऊन वाहतूक करीत असलेल्या आरोपींवर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. या कारवाईत दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल २३ लाख रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परभण
२३ लाखांची केबल वायर चोरी उघडकीस   -स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई, दोघे आरोपी ताब्यात


परभणी, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

चोरीचे केबल वायर घेऊन वाहतूक करीत असलेल्या आरोपींवर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. या कारवाईत दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल २३ लाख रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या घटनांत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हे उघडकीस आणण्याकामी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक घरफोडी आणि फरार आरोपींचा शोध घेत गस्तीवर असताना तालुक्यातील पोखर्णी परिसरात काही आरोपी चोरीचे केबल वायर घेऊन वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रुचून मोठ्या शिताफिने दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी बाबू अण्णासाहेब शिंदे व दिलीप अण्णासाहेब शिंदे दोघे रा. पोखर्णी ता. परभणी असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून २३ लाख रुपये किंमतीचा चोरीच्या घटनेतील केबल वायर जप्त करण्यात आला. आरोपींची चौकशी केली असता ही चोरी जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीत केल्याचे उघड झाले असून त्या चोरीतील सर्व मुद्देमाल पथकाने जप्त केला. याप्रकरणी दैठणा पोलिसांत महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना दैठणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande