चोरीचा टाटा ४०७ पुण्याच्या दिशेने; पळस्पे पोलिसांनी काही तासांत मुसक्या आवळल्या
रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। जनरेटरसह चोरीला गेलेला टाटा ४०७ टेम्पो पुण्याच्या दिशेने पसार होत असतानाच पळस्पे महामार्ग पोलिसांनी सतर्कता दाखवत अवघ्या काही तासांत त्याचा माग काढला. अमेठी पार्किंग परिसरातून चोरीचा टेम्पो हस्तगत करत पोलिसांनी चालक संशयित
# पळस्पे महामार्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई; जनरेटरसह चोरीचा टाटा ४०७ काही तासांत हाती  **पनवेल :** जनरेटरसह चोरीला गेलेला टाटा ४०७ टेम्पो पुण्याच्या दिशेने पसार होत असतानाच पळस्पे महामार्ग पोलिसांनी सतर्कता दाखवत अवघ्या काही तासांत त्याचा माग काढला. अमेठी पार्किंग परिसरातून चोरीचा टेम्पो हस्तगत करत पोलिसांनी चालक संशयित कुंदन कुमार मिश्रा याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक केदार भीमराव कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.  एमएच ०४ डीटी ३७८१ क्रमांकाचा सिल्व्हर रंगाचा टाटा ४०७ टेम्पो जनरेटरसह चोरीला गेल्याची माहिती रात्रीच्या गस्तीवर असलेल्या अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विन कुमार कागले यांनी पळस्पे महामार्ग पोलीस केंद्राचे ड्युटी अधिकारी केदार कुंभार यांना दिली. चोरीचा टेम्पो पुण्याच्या दिशेने जात असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने नाकाबंदी व शोधमोहीम सुरू केली.  कुंभार यांनी पोलीस हवालदार किरण सुरेश महाजन आणि अतुल माणिकराव जगताप यांच्यासह परिसरात गस्त वाढवली. दरम्यान, अमेठी पार्किंग परिसरात एका वाहनाच्या आडोशाला संशयास्पदरीत्या उभा असलेला टाटा ४०७ पोलिसांच्या नजरेस पडला. तपासणी केली असता तो चोरीला गेलेला टेम्पो असल्याचे स्पष्ट झाले.  चालकाची चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला. अधिक चौकशीत चालकाची ओळख कुंदन कुमार मिश्रा अशी पटली. पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेत संशयिताला पुढील कारवाईसाठी अँटॉप हिल पोलिसांच्या स्वाधीन केले.  **चोरीचा टेम्पो सापडणार कुठे? याचा तपास सुरू असतानाच पळस्पे पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव काही तासांतच उधळला गेला.**


रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। जनरेटरसह चोरीला गेलेला टाटा ४०७ टेम्पो पुण्याच्या दिशेने पसार होत असतानाच पळस्पे महामार्ग पोलिसांनी सतर्कता दाखवत अवघ्या काही तासांत त्याचा माग काढला. अमेठी पार्किंग परिसरातून चोरीचा टेम्पो हस्तगत करत पोलिसांनी चालक संशयित कुंदन कुमार मिश्रा याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक केदार भीमराव कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एमएच ०४ डीटी ३७८१ क्रमांकाचा सिल्व्हर रंगाचा टाटा ४०७ टेम्पो जनरेटरसह चोरीला गेल्याची माहिती रात्रीच्या गस्तीवर असलेल्या अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विन कुमार कागले यांनी पळस्पे महामार्ग पोलीस केंद्राचे ड्युटी अधिकारी केदार कुंभार यांना दिली. चोरीचा टेम्पो पुण्याच्या दिशेने जात असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने नाकाबंदी व शोधमोहीम सुरू केली.

कुंभार यांनी पोलीस हवालदार किरण सुरेश महाजन आणि अतुल माणिकराव जगताप यांच्यासह परिसरात गस्त वाढवली. दरम्यान, अमेठी पार्किंग परिसरात एका वाहनाच्या आडोशाला संशयास्पदरीत्या उभा असलेला टाटा ४०७ पोलिसांच्या नजरेस पडला. तपासणी केली असता तो चोरीला गेलेला टेम्पो असल्याचे स्पष्ट झाले.

चालकाची चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला. अधिक चौकशीत चालकाची ओळख कुंदन कुमार मिश्रा अशी पटली. पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेत संशयिताला पुढील कारवाईसाठी अँटॉप हिल पोलिसांच्या स्वाधीन केले. चोरीचा टेम्पो सापडणार कुठे? याचा तपास सुरू असतानाच पळस्पे पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव काही तासांतच उधळला गेला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande