गोवंशीय जनावराची बेकायदा कत्तल; तिघांना अटक
रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। : कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोटलवाडी येथे गोवंशीय जातीच्या जनावराची बेकायदेशीर कत्तल केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटलवाडी, पो. गौळवाडी
गोवंशीय जनावराची बेकायदा कत्तल; तिघांना अटक


रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। : कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोटलवाडी येथे गोवंशीय जातीच्या जनावराची बेकायदेशीर कत्तल केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटलवाडी, पो. गौळवाडी, ता. कर्जत येथे आरोपी क्रमांक १ ते ३ हे गोवंशीय जातीच्या जनावराची बेकायदेशीर कत्तल केल्याच्या स्थितीत आढळून आले. घटनास्थळी गोवंशीय मांस तसेच जनावर कापण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारेही आढळून आली.

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४५/२०२६ अन्वये गोवंश हत्या बंदी अधिनियमाच्या कलम ५, ९, ५(क), ९(अ) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३२५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून. या प्रकरणाचा पुढील तपास अधिक पोलीस उपनिरीक्षक नवले करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande