सॅमसंग गॅलेक्सी एस२६ एफई लाँच
अँड्रॉइड १७ आणि वन यूआय ९सह येणारा पहिला फोन मुंबई, 29 ऑगस्ट (हिं.स.)। सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एस२६ मालिकेतील सर्वात स्वस्त मॉडेल म्हणून गॅलेक्सी एस२६ एफई हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची रचना गॅलेक्सी एस२६ मालिकेतील इतर मॉडेल्ससारखीच अस
Samsung Galaxy S26 FE Launch


अँड्रॉइड १७ आणि वन यूआय ९सह येणारा पहिला फोन

मुंबई, 29 ऑगस्ट (हिं.स.)। सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एस२६ मालिकेतील सर्वात स्वस्त मॉडेल म्हणून गॅलेक्सी एस२६ एफई हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची रचना गॅलेक्सी एस२६ मालिकेतील इतर मॉडेल्ससारखीच असून, अँड्रॉइड १७ वर आधारित वन यूआय ९ सॉफ्टवेअरसह लाँच होणारा हा पहिला स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा फोन ४ सप्टेंबरपासून जगभरातील काही निवडक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

गॅलेक्सी एस२६ एफईमध्ये ६.७ इंचांचा फुल एचडी प्लस डायनॅमिक अमोलेड २एक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनला १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि तब्बल १,९०० निट्सपर्यंत ब्राइटनेस मिळतो. फोनमध्ये ३ नॅनोमीटर प्रक्रियेवर आधारित एक्सिनॉस २५०० प्रोसेसर देण्यात आला असून, ८ जीबी रॅमसह १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेजचे पर्याय उपलब्ध आहेत. फोनमध्ये ४,९०० एमएएच क्षमतेची बॅटरी असून ती ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या माहितीनुसार, अवघ्या ३० मिनिटांत बॅटरी ६९ टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. मात्र, ४५ वॅटचा चार्जर बॉक्समध्ये मिळणार नाही. फोनमध्ये १५ वॅट वायरलेस चार्जिंग आणि वायरलेस पॉवर शेअरची सुविधाही आहे.

कॅमेऱ्याच्या बाबतीत फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा मुख्य वाइड अँगल कॅमेरा, १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. टेलिफोटो कॅमेऱ्यामुळे ३एक्स ऑप्टिकल झूम मिळतो. सेल्फीसाठी ८५ अंश फील्ड ऑफ व्ह्यूसह १२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. माय फॅनकॅम, सुपर स्टेडी विथ हॉरिझॉन्टल लॉक आणि नाइटोग्राफी यांसारखी कॅमेरा वैशिष्ट्ये यात आहेत.

फोनमध्ये गॅलेक्सी एआय, नाऊ ब्रीफ, नाऊ नज, सर्कल टू सर्च, फोटो असिस्ट आणि जेमिनी ओम्नी यांसारखी एआय वैशिष्ट्ये मिळतात. फोटो असिस्टच्या मदतीने नैसर्गिक भाषेत फोटोमध्ये बदल करता येतात. तसेच जेमिनी ओम्नीच्या मदतीने गॅलरीतील फोटो आणि व्हिडिओंपासून क्लिप तयार व संपादित करता येतील. गॅलेक्सी एस२६ एफईचे तीन रंग उपलब्ध आहेत—ब्लूबेरी, ग्रॅफाइट आणि पिस्ताशिओ. १२८ जीबी मॉडेलची किंमत ७९९ युरो, २५६ जीबी मॉडेलची किंमत ८९९ युरो, तर ५१२ जीबी मॉडेलची किंमत १,०९९ युरो ठेवण्यात आली आहे. भारतीय किंमत अद्याप जाहीर झालेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande