रत्नागिरी : १७ वर्षीय मुलाने मागवली १ किलो सल्फर पावडर
रत्नागिरी, 29 ऑगस्ट (हिं.स.) । खेड तालुक्यात एका १७ वर्षीय मुलाने एक किलो सल्फर पावडर ऑनलाइन मागवल्याचा प्रकार समोर आला असून, याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. संबंधित मुलासह त्याच्या पालकांची चौकशी सुरू करण्यात आली असून, प्रकरणाचा अ
रत्नागिरी : १७ वर्षीय मुलाने मागवली १ किलो सल्फर पावडर


रत्नागिरी, 29 ऑगस्ट (हिं.स.) । खेड तालुक्यात एका १७ वर्षीय मुलाने एक किलो सल्फर पावडर ऑनलाइन मागवल्याचा प्रकार समोर आला असून, याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. संबंधित मुलासह त्याच्या पालकांची चौकशी सुरू करण्यात आली असून, प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी ठाणे क्राइम ब्रँचचे अधिकारी खेडमध्ये दाखल झाले आहेत.

संबंधित मुलाने सल्फर पावडर नेमकी कोणत्या उद्देशाने मागवली, ऑनलाइन ऑर्डरमागील कारण काय तसेच तिचा वापर कशासाठी करण्यात येणार होता, याबाबत पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.

प्राथमिक चौकशीत संबंधित पावडर प्रयोगासाठी मागविण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी एक किलो पावडर का मागविण्यात आली, याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत. या प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींची पडताळणी करून तपास पुढे नेण्यात येत आहे.

दरम्यान, संबंधित मुलगा अल्पवयीन असल्याने चौकशी अत्यंत काळजीपूर्वक करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande