
धाराशिव, 03 ऑगस्ट (हिं.स.)।
माजी सैनिकांच्या पत्नी,माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच माजी सैनिक महिला पाल्य यांच्यासाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को),पुणे यांच्या वतीने महिला सुरक्षा रक्षक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.
मेस्को,धाराशिव येथे होणाऱ्या या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मासिक वेतनासह दर सहा महिन्यांनी वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार आहे.तसेच कामगार कायद्यानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.),कर्मचारी राज्य विमा योजना (ई.एस.आय.),ग्रॅज्युएटी आदी सुविधांचाही लाभ मिळणार आहे.
या भरतीसाठी इच्छुक माजी सैनिक पत्नी,माजी सैनिक विधवा पत्नी तसेच माजी सैनिक महिला पाल्य यांनी अधिक माहितीसाठी खालील दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच सर्व इच्छुकांनी आपल्या सर्व मूळ कागदपत्रांसह दि.५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धाराशिव येथे उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव,दूरध्वनी : ०२४७२ -२२२५५७,भ्रमणध्वनी : ७५८८५२७५५४,
श्री.गंगाधर गायकवाड : (९४२२३०७५९३)
श्री. बबन कोळी (८०११४१४३६०)
यांचेशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis