शाळा सुरू होऊन एक महिना उलटला, अद्याप दुसऱ्या गणवेशासाठी निधी नाही
अमरावती, 03 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिना उलटला आहे. मात्र, जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. शाळेच्या
शाळा सुरू होऊन एक महिना उलटला, अद्याप दुसऱ्या गणवेशासाठी निधी नाही; शिक्षण विभागाने वरिष्ठांकडे केली मागणी


अमरावती, 03 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिना उलटला आहे. मात्र, जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना २ गणवेश देण्याचा दावा करणाऱ्या शासन व प्रशासनाच्या या ढिसाळ कार्यपद्धतीबाबत पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पहिल्या गणवेशाच्या शिल्लक निधीसह दुसऱ्या गणवेशाचा पूर्ण निधी मिळून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला ३ कोटी ३९ लाख ९ हजार ३०० रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. नवीन ऑनलाइन प्रणालीद्वारे शिक्षण विभागाने वरिष्ठ स्तरावर निधीची मागणी पाठविली आहे. जिल्ह्यातील १५५७ शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या १लक्ष१ हजार ३३१ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभदिला जात आहे. यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात प्रति गणवेश २४० रुपये या प्रमाणे २कोटी४३ लाख १९ हजार ४४० रुपये निधी मंजूर करून तालुकास्तरावर वितरित केला आहे. या निधीतही पालकांना स्वतःच्या खिशातून काही रक्कम खर्च करून एक गणवेश शिवून घ्यावा लागला आहे. हा गणवेश परिधान करूनच विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी दाखल झाल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी दोन गणवेश देण्याची तरतूद आहे. यामध्ये एक नियमित शालेय गणवेश, तर दुसरा स्काऊट-गाइड गणवेश असतो.दोन गणवेश करीता ६००रुपये देणे आवश्यक आहे.या मध्ये सर्व मुली,अनु.जाती मुले,अनु.जमाती मुले,बीपीएल मधिल मुले,उर्वरित मुले ओबिसी,सर्व साधारण मुले यांना याचा लाभ मिळतो.पण स्वातंञ्य दिन येत असतांना दुसरा गणवेश करीता शाळांना निधी मिळाला नाही.तसेच शालेय खर्चा करीता समग्र शिक्षा अभियान निधी आणि सादिल रक्कम मिळाली नाही त्यामुळे शालेय खर्च मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या खिशातुन सुरु आहे.हा निधी सुध्दा शाळांना तात्काळ मिळावा अशी मागणी मुख्याध्यापक,शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande