
छत्रपती संभाजीनगर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली महसूल सेवा व शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
जिल्हास्तरीय शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इतर बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास विभागीय आयुक्त जी. श्रीकांत (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., तसेच अभियानांतर्गत विविध सेवांचा लाभ घेतलेले लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानांतर्गत नागरिकांना सातबारा, फेरफार, वारस नोंद, विविध दाखले, प्रलंबित अर्जांचे निवारण तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis