परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद बोर्डीकर, उपाध्यक्षपदी राजेश गोरेगावकर बिनविरोध
परभणी, 03 ऑगस्ट (हिं.स.)। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची व उपाध्यक्ष पदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष
परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर तर उपाध्यक्षपदी राजेश गोरेगावकर यांची बिनविरोध निवड


परभणी, 03 ऑगस्ट (हिं.स.)।

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची व उपाध्यक्ष पदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन पदांच्या निवडीकरीता आज सोमवार रोजी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली. सकाळी 11 ते साडे अकरा या वेळेत या दोन्ही पदाकरीता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज मागवले होते. त्यात अध्यक्ष पदाकरिता ज्येष्ठ नेते बोर्डीकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला तर उपाध्यक्ष पदाकरीता राजेश पाटील गोरेगावकर व आमदार सईद खान या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते .या अर्जांची छाननी प्रक्रिया ही पाठोपाठ पार पडली. त्या प्रक्रियेत अध्यक्ष पदाकरीता बोर्डीकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज वैध ठरला तर उपाध्यक्ष पदाकरीता दाखल झालेल्या दोघांचीही अर्ज वैध ठरले. अध्यक्ष पदाकरीता बोर्डीकर यांची निवड हे निश्चित झाले होते,दरम्यान अर्ज दाखल केलेल्या या दोघांपैकी आमदार स ईदखान यांनी आपला उमेदवारी अर्ज अंतिम क्षणी मागे घेतला. त्यामुळे गोरेगावकर यांच्या उपाध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोघांची नावे जाहीर केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande