लातूर-बालनाट्य दिनानिमित्त ऐतिहासिक सादरीकरणांची पर्वणी; १५० बालकलाकारांचा सहभाग
लातूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने बालनाट्य दिनानिमित्त ‘इतिहास महाराष्ट्राचा’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. निश्चय संस्कृत क्लासेस, लातूर
बाल नाट्य


लातूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने बालनाट्य दिनानिमित्त ‘इतिहास महाराष्ट्राचा’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. निश्चय संस्कृत क्लासेस, लातूर येथे झालेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातील सुमारे १५० बालकलाकारांनी सहभाग नोंदवत आपल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.

दरवर्षी या स्पर्धेसाठी ऐतिहासिक व चरित्रात्मक विषय निश्चित केला जातो. यंदा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य’ या विषयावर आधारित एकल व सामूहिक नाट्य, नृत्य आणि संगीत सादरीकरणाची स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेचे उद्घाटन रंगकर्मी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद महानगर शाखेचे अध्यक्ष तथा नाट्यदिग्दर्शक अॅड. शैलेश गोजमगुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी नाट्य समीक्षक व मुक्त पत्रकार अनिल पुरी, रंगकर्मी अॅड. हंसराज साळुंके, राजीव गड्डीमे, बालरंगभूमी परिषद लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य तसेच परीक्षक प्रा. डॉ. साईनाथ उमाटे व धनंजय नाकाडे उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी बालनाट्य दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना बालरंगभूमी ही मुलांच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. बालकलाकारांनी नृत्य, नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचे प्रभावी सादरीकरण केले.

स्पर्धेतील विजेते

एकल बालगट (वय ५ ते १० वर्षे)

- सर्वोत्कृष्ट : रियांशी होणकर

- उत्कृष्ट : अक्षरा आंधळे

- उत्तम : श्रेया दुणगावे

एकल मोठा गट (वय ११ ते १५ वर्षे)

- सर्वोत्कृष्ट : गार्गी जाधव

- उत्कृष्ट : नम्रता लुल्ले

- उत्तम : आदिश्री कासले

सामूहिक गट

- सर्वोत्कृष्ट : विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूल

- उत्कृष्ट : ए. पी. डान्स अकॅडमी

- उत्तम : शारदा इंटरनॅशनल स्कूल

विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

अंतिम फेरीसाठी लातूरची निवड

९ ऑगस्ट २०२६ रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूल, गार्गी नवलाजी जाधव आणि रियांशी होणकर यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख महेश बिडवे यांनी केले. सूत्रसंचालन तेजश्री घवले पाटील यांनी केले, तर आभार रणजित आचार्य यांनी मानले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रणजित आचार्य, महेश बिडवे, प्रा. नवलाजी जाधव, मयूर राजापुरे, रवि अघाव, विशाल वाटवडे, हिरा वेदपाठक, वनिता गोजमगुंडे, महेश पवार, प्रिती ठाकूर, तेजश्री घवले पाटील, भीम दुणगावे, वसुधा पाटील, रविकिरण सावंत, ऋतुराज सुरवसे, आर्यन गिरवलकर, कृष्णा शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande