चंद्रपूर : सेव्हन सिस्टर पेरजागडावरून परतणाऱ्या दुचाकीला अपघात; तरुण-तरुणी गंभीर
चंद्रपूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। नागभीड तालुक्यातील सोनापूर गावालगत असलेल्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर (सात बहिणी) पेरजागड पर्यटनस्थळावरून परतणाऱ्या भरधाव दुचाकीस्वाराची समोरून येणाऱ्या चारचाकीला जोराची धडक बसली. या घटनेत दुचाकीवरील तरूण व तरूणी गंभीर ज
चंद्रपूर : सेव्हन सिस्टर पेरजागडावरून परतणाऱ्या दुचाकीला अपघात; तरुण-तरुणी गंभीर


चंद्रपूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)।

नागभीड तालुक्यातील सोनापूर गावालगत असलेल्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर (सात बहिणी) पेरजागड पर्यटनस्थळावरून परतणाऱ्या भरधाव दुचाकीस्वाराची समोरून येणाऱ्या चारचाकीला जोराची धडक बसली. या घटनेत दुचाकीवरील तरूण व तरूणी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता गोविंदपूर-सोनापूर मार्गावरील खाटीक नाल्याजवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार नागभीड तालुक्यातील सोनापूर गावालगत असलेले सात बहिणी पेरजागड (सेव्हन सिस्टर) हे पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. रविवारीही हजारो पर्यटकांनी पेरजागडावर गर्दी केली होती. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चंद्रपूरकडे परतणाऱ्या पर्यटकांपैकी एका दुचाकीस्वाराची गोविंदपूर-सोलापूर मार्गावरील खाटीक नाल्याजवळ समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाची जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील तरुण व त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून दोघांनाही ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातात चारचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले असून त्यामधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande