शालेय गणवेश गुणवत्तेची तपासणी केंद्रप्रमुखांना शंभर टक्के उद्दिष्ट; कपड्याचे नमूने प्रयोगशाळेत पाठविणार
यवतमाळ 03 ऑगस्ट (हिं.स.) दरवर्षी प्रमाणे यंदाही पहिल्याच गणवेशाला घरघर लागली आहे. प्रती गणवेशामागे ६० रुपयांना कात्री लावून केवळ २४० रुपये प्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. समग्र शिक्षा आणि पीएमश्री स्कूलचे मिळून एक लाख ५३ हजार ४३५ विद्यार
शालेय गणवेश गुणवत्तेची तपासणी केंद्रप्रमुखांना शंभर टक्के उद्दिष्ट; कपड्याचे नमूने प्रयोगशाळेत पाठविणार


यवतमाळ 03 ऑगस्ट (हिं.स.)

दरवर्षी प्रमाणे यंदाही पहिल्याच गणवेशाला घरघर लागली आहे. प्रती गणवेशामागे ६० रुपयांना कात्री लावून केवळ २४० रुपये प्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. समग्र शिक्षा आणि पीएमश्री स्कूलचे मिळून एक लाख ५३ हजार ४३५ विद्यार्थ्यांना गणवेश शिलाई करून मिळाला आहे. आता या गणवेशाची गुणवत्ता तपासणी सुरू आहे. केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकार्!यांच्या खांद्यावर तपासणीची जबाबदार सोपविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठव्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती सर्व मुले तसेच दारिद्र रेषेखालील पालकांचे पाल्यांमध्ये समग्र शिक्षाचे एक लाख ४५ हजार १९०, तर पीएमश्री स्कूलचे आठ हजार २४५, असे मिळून एक लाख ५३ हजार ४३५ मुलांना दोन गणवेश देण्यात येणार आहे. प्रती गणवेश तीनशे रुपये प्रमाणे पैसे मंजूर करण्यात आले होते. मात्र, शासनाने यंदा पहिल्याच गणवेशाच्या निधी वितरणाला कात्री लावली आहे. प्रती गणवेश २४० प्रमाणे तीन कोटी ४८ लाख ४५ हजार ६०० रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. प्राप्त निधी पंचायत समितीनिहाय वितरित करण्यात आला असून, शाळा प्रशासनाने मिळालेल्या निधीतून विद्यार्थीनिहाय गणवेश उपलब्ध करून दिला आहे. शाळा व्यवस्थापन समितीला गणवेशाचा रंग आणि कापड खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला होता. तर स्थानिक महिला बचत गटांमार्फत गणवेश शिलाई करून घ्यायचे निर्देश देण्यात आले होते. स्थानिक पातळीवर बचत गट नसेल, तर आजूबाजूच्या क्षेत्रातील बचतगटांकडून शिलाई करून घेण्यास मुभा होती. परंतु, कापडाची गुणवत्ता चांगली असल्याची खात्री केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकार्!यांना घेण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. यात केंद्रप्रमुखांना शंभर टक्के, तर गटशिक्षणाधिकार्!यांना ३० टक्के शाळेतील विद्यार्थ्यांचे गणवेश तपासणी अनिवार्य केली आहे. ही तपासणी आता सुरू करण्यात आली आहे. गणवेशाची गुणवत्ता चांगली नसल्यास कपड्याचे नमूने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. यात कुठलाही अनुचित प्रकार आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यांना नवा गणवेश घेऊन

दुसर्!या गणवेश, बूट, पायमोज्याचा पत्ताच नाही

यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख ५३ हजार ४३५ विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येणार आहे. पहिला गणवेशाचा जून महिन्यात निधी मिळाला. परंतु, ८१ लाख २६ हजार रुपयांना कात्री लावण्यात आली. आता दुसर्!या गणवेशाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे. मात्र, ऑगस्ट महिना उजाडला. तरीसुद्धा दुसर्!या गणवेशाचा तसेच बूट, पायमोज्याचा निधी समग्र शिक्षाला मिळाला नाही. ऑगस्ट महिन्याच्या दुसर्!या आठवड्यात निधी मिळण्याची शक्यता आहे.द्यावा लागणार आहे. हा आर्थिक फटका मुख्याध्यापक, शिक्षकांच्या माथी बसण्याची शक्यता आहे.

-------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande