
बीड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून, ती हजारो कुटुंबांच्या विश्वासाची आणि स्वप्नांची जपवणूक करणारी संस्था आहे. सहकार ही केवळ आर्थिक चळवळ नसून ती विश्वास, पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि परस्पर सहकार्य यांच्या भक्कम पायावर उभी असलेली लोकचळवळ आहे. आपल्या व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने स्थापने पासून ही मूल्ये जपण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. गेल्या काही आर्थिक वर्षात अनेक आर्थिक आणि स्पर्धात्मक आव्हानांचा सामना करत असतानाही आपल्या सर्वांचे सहकार्याने बँकेने समाधानकारक प्रगती साधली असल्याचे आसल्याचे प्रतिपादन द्वारकादास मंत्री बँकेचे अध्यक्ष डॉ. आदीत्य सारडा म्हणाले.
बीड शहरातील बालाजी मंदिर सभागृहात व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची ६४ वी वार्षिक सर्व साधारण सभा बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सारडा यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.बैठकीला सि.ए.गिरीश गिल्डा, डॉ.आदिती सारडा, अंजली पाटील, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी मोमीन शफियोद्दिन, माजी मुख्यकार्यकारी अधिकारी राधेश्याम सोनी आदींची उपस्थिती होती.
बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सारडा यांनी बँकेचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा सादर करतांना सांगितले की बँकेने ठेवी वाढविणे, दर्जेदार कर्जवाटप, नियमित कर्जवसुली, आर्थिक शिस्त आणि ग्राहकाभिमुख सेवा या सर्व बाबींवर विशेष भर दिला आहे. अहवाल वर्षा अखेर बँकेचे एकुण भागभांडवल १७८२.१८ लाख झाले असून बँकेच्या ठेवी ६५७१.८९ लाख तर एकुण कर्ज ५८२४.४४ लाख इतके झाले आहे. मार्च -२०२६ अखेर बँकेचे राखीव व इतर निधी ९३२२.१२ लाख इतका झालेला आहे. त्यामध्ये राखीव निधी १५२८.२८ लाख, इमारत निधी २७१.७६ लाख, बुडीत व संशयीत निधी ५१४५.८० लाख, गुंतवणुक घसारा निधी २६९.९४ लाख, उत्तम जिंदगी वरील तरतुद १७.०० लाख, व इतर निधी रु. २०८९.३३ लाख अहवाल वर्षा अखेर बँकेकडे उपलब्ध आहेत.बँकेची एकुण गुंतवणूक ८००७.०१ लाख आहे. बँकेने केलेल्या गुंतवणूकीमध्ये ७००१.८१ लाख रुपयांची गुंतवणूक ही शासकीय रोख्यामध्ये केलेली असून रिझर्व्ह बँकेचे नियमाप्रमाणे शासकीय रोख्यामध्ये NDTL च्या १८ टक्के गुंतवणूक करावी लागते परंतु बँकेने केलेल्या गुंतवणुकीचे प्रमाण हे १२७.५२ टक्के एवढे आहे. जे आवश्यकते पेक्षा ७ पटीने जास्त आहे याच बरोबर बँकेने ८७५.०० लाख रुपयांची गुंतवणूक ही विविध राष्टीयकृत व व्यापारी बँकेत मुदत ठेवी मध्ये केली आहे. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेकडे एकूण तरलता निधी ९२३२.७२ लाख एवढा उपलब्ध आहे.जो बँकेच्या एकूण ठेवीच्या १४५ टक्के पेक्षा जास्त आहे म्हणजे कर्ज वाटपासाठी बँकेकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून बँकेच्या सभासदांना विविध योजना द्वारे कर्ज वाटप करण्याचे धोरण संचालक मंडळाने आखले आहे. छोटे व्यापारी, उद्योजक, पगारदार कर्मचारी व गरजूंना कर्ज वाटप करणे चालू आहे. सभासदांनी यांचा लाभ ध्यावा असे अवाहन त्यांनी केले.
बँकेचे वैधानिक लेखापरिक्षकानी चालू अहवाल वर्षात बँकेस ऑडीट वर्ग ‘अ’ दिलेला असून बँकेचे CRAR चे प्रमाण १०३.०४ % निश्चित केले असून नेटवर्थ २१८६.७३ लाख आणि निव्वळ NPA चे प्रमाण 0.00 % निश्चीत केले आहे.यावरून बँकेची स्थिती किती भक्कम व सक्षम असल्याचे दिसून येते. बँकेच्या २० शाखा कार्यरत असून त्यामध्ये सध्या जास्तीत जास्त व्यवहार वाढवण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ग्राहकांना अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ सेवा देण्यासाठीचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे व एकजूट, विश्वास आणि सहकार्य या तीन मूल्यांच्या बळावर बँकेने आजवर यशस्वी वाटचाल केली असल्याचे सांगून यापुढेही सर्व सभासद,ग्राहक,अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेला सहकार क्षेत्रातील एक आदर्श आणि अग्रगण्य बँक बनवू, असा मला ठाम विश्वास असल्याचे बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सारडा यांनी सांगितले.सभेत बँकेतील वसुलीचे उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
अध्यक्ष आदित्य सारडा यांच्या नेतृत्वात बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मबजूत
द्वारकादास मंत्री बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असून वैधानिक लेखापरीक्षण अहवालात सलग ‘अ’ वर्ग मिळाला आहे. बँकेने नेट एनपीए ०.००% ठेवण्यात यश मिळवले असून CRAR चे प्रमाण १०३.०४% आणि नेटवर्थ २,१८६.७३ लाख रुपयांवर पोहोचले आहे. सध्या बँकेकडे ६,५७१.८९ लाख रुपयांच्या ठेवी आणि ५,८२४.४४ लाख रुपयांचे कर्जवाटप आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत बँकेने ८,००७.०१ लाख रुपयांची गुंतवणूक केली असून त्यापैकी ७,००१.८१ लाख रुपये शासकीय रोख्यांमध्ये गुंतवले आहेत, जे रिझर्व्ह बँकेच्या नियमापेक्षा तब्बल ७ पटीने (१२७.५२%) जास्त आहे. बँकेकडे ९,२३२.७२ लाख रुपयांचा तरलता निधी उपलब्ध असून हे प्रमाण एकूण ठेवींच्या १४५ टक्के आहे. सध्या २० शाखांद्वारे बँक आपल्या ग्राहकांना आधुनिक व जलद सेवा पुरवत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis