लातूर : जळकोट तालुक्यात पिकांवर हरणांचा डल्ला
लातूर, 03 ऑगस्ट (हिं.स.) : जळकोट तालुक्यात हरणांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, एका कळपात २५ ते ३० हारणाचा कळप आहे. हरणांची झालेली वाढ ही शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. सध्या शेतामध्ये कोवळे लहान पिक आहेत. त्यावर हरणांचा कळपाचा डल्ला मा
हरणांचा हैदोस


लातूर, 03 ऑगस्ट (हिं.स.) : जळकोट तालुक्यात हरणांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, एका कळपात २५ ते ३० हारणाचा कळप आहे. हरणांची झालेली वाढ ही शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. सध्या शेतामध्ये कोवळे लहान पिक आहेत. त्यावर हरणांचा कळपाचा डल्ला मारलेला दिसून येत आहे. सध्या परिस्थितीमध्ये पिके लहान असल्यामुळे हारणाचा कळप मोठ्या प्रमाणात शेतात सगळीकडे दिसून येत आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, वनविभागाने हारणाचा बंदोबस्त करण्यात यावा, असे शेतकऱ्याकडून बोलले जात आहे.

तालुक्यात सुरवातीला दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जवळपास ९८% पेरणी केली आहे. खते बियाणे यांचे बाजारात मोठ्या प्रमाणात भाव वाढले आहेत. तरी शेतकऱ्यांनी खरेदी करून पेरण्या केला आहेत. पण आता एक तर आता पंधरा दिवस पावसाने उघडडीप देऊन आता कुठे चार दिवस झाले संततधार पावसाची सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी महागामोलांचे खत बियाणे घेऊन पेरणी केली. कोवळी पिके तग धरतील का यांची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत असतानाच तर दुसरीकडे त्या कोवळा पिकावर हारणाचा हौदोस दिसून येत आहे.

हारणांनी पिके खाली तर खत बियाणे यांचा खर्च सुध्दा निघणार नाही यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातून फायदा होणार नसून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला जाणार आहे. शेतकऱ्यांना हारणापासून शेतातील पिकांचे उत्पन्न मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांना आपल्या शेतात राहूनच आपल्या शेतातील पिकांची राखण करावी लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande