श्रावण महिन्यात भाविकांसाठी भक्तनिवास खुले करण्याचा प्रयत्न - धनंजय मुंडे
बीड, 03 ऑगस्ट (हिं.स.) : परळी वैद्यनाथ येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शहरातील नगर परिषद शेजारी भव्य चार मजली भक्त निवास उभारण्यात आले असुन, येथील कामांची आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. भक्तनिवास उभा
धनंजय मुंडे


बीड, 03 ऑगस्ट (हिं.स.) : परळी वैद्यनाथ येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शहरातील नगर परिषद शेजारी भव्य चार मजली भक्त निवास उभारण्यात आले असुन, येथील कामांची आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. भक्तनिवास उभारणीत सुरुवातीच्या टप्प्यात १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून यामधून ८२ खोल्यांसह, स्वयंपाकगृह, भोजनकक्ष इत्यादी कामे पूर्ण झाली असून याठिकाणी ५०० भक्त एकच वेळी राहू शकतील इतकी क्षमता आहे. या ठिकाणी पी ओ पी व फर्निचरचे काम बाकी असून श्रावण महिन्यात भाविकांसाठी हे भक्तनिवास खुले करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. शहराच्या मध्यवर्ती भागात उभारलेले हे भव्य भक्त निवास वैद्यनाथ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नाममात्र शुल्कात उपलब्ध होणार असल्याने बाहेरून येणाऱ्या भाविकांची उत्तम सोय होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande