छ. संभाजीनगर : आदर्श नागरी पतसंस्थेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांचे आमरण उपोषण
छत्रपती संभाजीनगर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित २०२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेत कलेक्टर कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार इम्तियाज
छ. संभाजीनगर : आदर्श नागरी पतसंस्थेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांचे आमरण उपोषण


छत्रपती संभाजीनगर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित २०२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेत कलेक्टर कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. ठेवीदारांच्या पैशांची तातडीने परतफेड, संस्थेच्या मालमत्ता ताब्यात घेऊन विक्री प्रक्रिया गतीने पूर्ण करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande