पाथरीतील शेतकर्यांचे उपजिल्हाधिकार्यांना निवेदन; ऊस व खरीप पिके वाचविण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा
परभणी, 03 ऑगस्ट (हिं.स.)। अपुर्या पावसामुळे पाथरी तालुक्यातील खरीप पिके व ऊस संकटात सापडल्याने शेतकर्यांनी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाथरी तालुक्यातील कालव्यांना तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्यांनी उपजिल्हाधिकार्यांना
पाथरीतील शेतकर्यांचे उपजिल्हाधिकार्यांना निवेदन; ऊस व खरीप पिके वाचविण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा


परभणी, 03 ऑगस्ट (हिं.स.)।

अपुर्या पावसामुळे पाथरी तालुक्यातील खरीप पिके व ऊस संकटात सापडल्याने शेतकर्यांनी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाथरी तालुक्यातील कालव्यांना तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्यांनी उपजिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. धनंजय गणेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली पाथरीचे उपजिल्हाधिकारी व जायकवाडी उपविभागीय अभियंता यांना आपल्या मागणी संदर्भातील एक तपशीलवार निवेदन देण्यात आले. त्याद्वारे, यंदाच्या हंगामात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेला ऊस करपू लागला आहे. खरीप पिकांचीही अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, पिण्याच्या पाण्याचे संकटही तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतीसह जनजीवनावर गंभीर परिणाम होत आहे. सध्या जायकवाडी धरणाचे काही दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याने त्या धरणातील पाणी डाव्या कालव्यातून पाथरी तालुक्यातील कालव्यांमध्ये सोडावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. वेळेत पाणी उपलब्ध झाल्यास खरीप पिकांना मोठा दिलासा मिळेल तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर उपसभापती श्याम उत्तमराव धर्मे, सरपंच शरद आबासाहेब यादव, माजी उपसभापती रमेश संतोष तांबडे, सरपंच अण्णासाहेब शिवाजीराव झुटे यांच्यासह तालुक्यातील अनेक गावांतील शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande