
यवतमाळ, 03 ऑगस्ट (हिं.स.) :
यवतमाळ जिल्ह्यात सलग दोन दिवस आलेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून नदीला मिळणारे बहुतांश नालेही ओव्हरफ्लो झाले आहेत. परिणामी नदीकाठच्या तसेच नाल्यालगत असलेल्या शेकडो एकर शेतीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने उभी पिके पाण्याखाली आले आहे. त्यामुळे शेतकर्!यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पैनगंगा नदी झरी-जामणी तालुक्याच्या दक्षिण सीमेवरून वाहते. या नदीला मिळणार्!या लहान-मोठ्या नाल्यांमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या परिसरातील शेती पूर्णपणे जलमय झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असून नदीकाठच्या गावांतील शेतकर्!यांना पुराच्या पाण्याचा फटका बसत आहे. मुसळधार पावसाबरोबरच धरणातूनही पाणी सोडले जात असल्याची चर्चा दरवर्षी ऐकायला मिळते. त्यामुळे नदीची पाणीपातळी आणखी वाढून पुराची तीव्रता वाढते, असा आरोप काही शेतकर्!यांकडून केला जात आहे. मात्र, या दूरवरच्या धरणाचा तालुक्यातील शेतकर्!यांना सिंचनाच्या दृष्टीने काहीच लाभ मिळत नसल्याचीही खंत व्यक्त केली जात आहे. मात्र, पावसाळ्यात याच धरणातील पाणी विसर्जित केले जात असल्याने नुकसान मात्र ठरलेले असते. सध्या शेतांमध्ये तूर, सोयाबीन, कापसाची पिके आहेत. तूर पिकाला दीर्घकाळ साचलेले पाणी अत्यंत घातक ठरत असून त्यामुळे झाडांची वाढ खुंटणे, पिवळेपणा येणे किंवा पिके नष्ट होण्याची शक्यता असते. तूर व सोयाबीनलाही पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
जल व्यवस्थापनाची मागणी
सलग दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदी व तिच्या उपनाल्यांना पूर आला असून नदीकाठच्या शेकडो एकर शेतीत पाणी शिरले आहे. तूर, सोयाबीन व कापूस ही उभी पिके पाण्याखाली गेल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती निर्माण झाली आहे. दरवर्षी पुराचा फटका बसत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची शेतकऱ्यांची खंत आहे. पूरनियंत्रण बंधारे, नदी-नाल्यांचे नियोजन आणि प्रभावी जल व्यवस्थापनाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी