नांदेड : कंधार शहराला अस्वच्छतेचा विळखा; पालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांची नाराजी
नांदेड, 03 ऑगस्ट (हिं.स.)।नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कंधार शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून, दुर्गंधी, डांसाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा प्रश्न नि
नांदेड : कंधार शहराला अस्वच्छतेचा विळखा; पालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांची नाराजी


नांदेड, 03 ऑगस्ट (हिं.स.)।नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कंधार शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून, दुर्गंधी, डांसाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

भवानी नगर कमानीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, येथे डुकरांचा वावर वाढला आहे. सिद्धार्थ नगर परिसरातील नाल्यांची दोन महिन्यांपासून सफाई झाली नसल्याचा आरोप असून, साफसफाईनंतरही कचरा जागेवरच पडून असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकेकाळी स्वच्छतेसाठी प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या कंधार नगरपालिकेच्या सध्याच्या अस्वच्छ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शहरातील अस्वच्छतेबाबत मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्याकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. समस्या घेऊन पालिकेत जाणाऱ्या नागरिकांना मुख्याधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारी असून, त्यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande