
पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यातील धाडसी स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि जननेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या अभिवादन कार्यक्रमास कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता प्रा. डॉ. रावसाहेब लटपटे यांच्यासह विद्यापीठातील विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु