
बीड, 03 ऑगस्ट (हिं.स.)।
स्मारक बचाव संघर्ष समितीने मांडलेल्या विविध मागण्यांचा सकारात्मक व आदरपूर्वक विचार करून त्याबाबत आज संबंधित विभागांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व संबंधित विभागांना विहित कालमर्यादेत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या स्पष्ट व कडक सूचना देण्यात आल्या. यावेळी माजलगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते मौलाना आझाद चौक तसेच बायपास मार्गावरील अतिक्रमणे येत्या गुरुवारपासून हटविण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. अतिक्रमणधारकांना वीजपुरवठ्यासाठी देण्यात आलेले अनधिकृत वीज मीटर एका दिवसाच्या आत काढून घेण्याची कार्यवाही महावितरणने करावी, अशाही सूचना देण्यात आल्या
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis