आमदार शे्खर निकम यांचा देवरूखमध्ये नागरिकांशी संवाद
रत्नागिरी, 3 ऑगस्ट (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या समस्या तातडीने जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी तत्परतेने कार्यवाही करावी, जेणेकरून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे निर्देश आमदार शेखर निकम यांनी अधिकाऱ्यांना दिले.

देवरूख येथील संपर्क कार्यालयात आयोजित नागरिक संवाद कार्यक्रमात आमदार निकम यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तालुक्यातील विविध भागांतील पाणीपुरवठा, वीज, पायाभूत सुविधा आणि इतर नागरी समस्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

यावेळी तालुकाध्यक्ष राजू पोमेंडकर, शहराध्यक्ष हनिफ हरचीरकर, युवक तालुकाध्यक्ष प्रतीक साळवी, पंकज पुसाळकर, नितीन भोसले, बाळू ढवळे यांच्यासह तहसीलदार अमृता साबळे तसेच सार्वजनिक बांधकाम, कृषी, जलजीवन मिशन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चर्चासत्रात येडगेवाडी येथील पाणीपुरवठा योजनेचा पंप तोडल्यामुळे धनगरवाडीचा पाणीपुरवठा खंडित झाल्याची समस्या संतोष येडगे व ग्रामस्थांनी मांडली. तसेच देवरूख, ताम्हाणे व तुळसणी परिसरात गेल्या आठवडाभरापासून वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे प्रफुल्ल बाईत, प्रतीक साळवी, संतोष पाल्ये, पप्पू गोवळकर आणि हनिफ हरचीरकर यांनी लक्ष वेधले.

देवरूख शहरातील विविध नागरी प्रश्नांबाबत बाळा कामेरकर, निधा कापडी, बोरूकर तसेच क्रांती व्यापारी संघटनेचे निखिल कोळवणकर यांनीही सूचना व मागण्या मांडल्या.

तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनीही आपल्या अडचणी मांडल्या. प्रत्येक तक्रारीची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देताना, जनतेच्या अडचणी समजून घ्या आणि त्यांचे निराकरण प्राधान्याने करा, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

 rajesh pande