
बीड, 03 ऑगस्ट (हिं.स.)।
मोहम्मद रफी साहेबांचा आवाज केवळ एक ध्वनी नव्हता, तो एक अनुभव होता,आनंदी भावनांच्या गहनतेचा एक प्रवास होता. ते एक महान अष्टपैलू पार्श्वगायक होते. त्यांनी 7348 गीते गायलेली आहेत.त्यांना 1967 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना सहा फिल्मफेअर पुरस्कारासह एक राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे. आपल्या आवाजाच्या परिस्पर्शाने त्यांनी अनेक गीते अजरामर केली. त्यांची गीते रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील असे मत मोहम्मद रफी यांच्या गीतांचे एक रसिक चाहते मनोज घुगे यांनी 'एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम' या कार्यक्रमातील सर्व सहभागी कलाकारांच्या सत्कार समारंभात कलाकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.प्राचार्य डी.जी. तांदळे, डॉ. संजय तांदळे, बाजीराव ढाकणे आदींनी देखील मोहम्मद रफी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. एम. एम. शेख, युसुफ पठाण, एस.एम. युसूफ, यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी यशवंतराव नाट्यगृह बीड येथे 'एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम, या कार्यक्रमात सर्व कलाकारांनी मोहम्मद रफी यांची गाजलेली गीते गाऊन नाट्यगृहातील सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले. नाट्यगृह रसिकांनी खचाखच भरलेले होते. कार्यक्रमातील सहभागी सर्व कलाकारांना स्वरा संगीत अकॅडमी मध्ये मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
सत्कारित कलाकार पुढीलप्रमाणे एम. एम.शेख,युसुफ पठाण, एस.एम. युसुफ, शेख मजहरोद्दीन,शेख सैलानी, सय्यद मुजीब, आकाश जाधव, अस्मिता सुरवसे, ललिता लांडगे,संध्या जाधव, निशा उजगरे,कृष्णा पांगरे, सय्यद हसीन अख्तर, डॉ. जोशी सह आदी कलाकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास बहुसंख्येने रसिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis