यवतमाळमध्ये शिंदे सेनेत संघटनात्मक फेरबदल
यवतमाळ, 03 ऑगस्ट (हिं.स.) आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात चार प्रभारी जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात
शिंदे सेनेत संघटनात्मक फेरबदल


यवतमाळ, 03 ऑगस्ट (हिं.स.)

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात चार प्रभारी जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतील बिनविरोध विजयामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे मनोबल अधिक उंचावले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दिग्रस, पुसद विधानसभा प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून यशवंत पवार, यवतमाळ, राळेगाव विधानसभा प्रभारी म्हणून गजानन डोमाळे, आर्णी, उमरखेड राजुदास जाधव, वणी आशीष खुलसंगे यांची नियुक्ती शिवसेना सचिव संजय मोरे यांनी केले. लवकरच जिल्ह्यातील इतर पदाधिकार्!यांमध्येही बदल व नियुक्ती करण्यात येणार आहे. नवनियुक्त प्रभारी जिल्हाप्रमुखांचे शिवसेना पश्चिम विदर्भ सहसंपर्क प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर मोहोड, जिल्हा संघटक साजिद शरीफ, जिल्हा समन्वयक संजय हातगावकर यांनी कौतुक केले.

------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande