सेलूत ‘आनंद अनुभूती’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणी, ३ ऑगस्ट (हिं.स.) : गुरुपौर्णिमेनिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने सेलू शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंद अनुभूती’ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत पार पडलेल्या या सहा दिवसीय शिबिरात तणावमुक्त,
सेलूत ‘आनंद अनुभूती’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


परभणी, ३ ऑगस्ट (हिं.स.) : गुरुपौर्णिमेनिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने सेलू शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंद अनुभूती’ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत पार पडलेल्या या सहा दिवसीय शिबिरात तणावमुक्त, सकारात्मक आणि आनंदी जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक किशोर घडे आणि अंकुश गरड यांनी विविध सत्रांद्वारे तणाव व्यवस्थापन, मानसिक स्वास्थ्य, सकारात्मक विचारसरणी तसेच आत्मविश्वास वाढविण्याचे महत्त्व समजावून सांगितले. दैनंदिन जीवनातील मानसिक शांतता आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक साधना व श्वसन तंत्राविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिर पूर्ण केलेल्या सहभागी नागरिकांनी आपले अनुभव व्यक्त करताना या उपक्रमामुळे मनातील अनामिक भीती दूर झाली असून आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले. नियमित साधना आणि श्वसन तंत्रामुळे मानसिक शांतता मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संजय ठाकूर, रामा वैद्य, मनीषा वैद्य, हर्षता चेचेडिया, बाळासाहेब सोनटक्के, ज्ञानेश्वर मोगल यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande