चंद्रभागा पूरस्थितीचा आमदार समाधान आवताडेंकडून आढावा
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.) चंद्रभागा (भीमा) नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पूरग्रस्त भागाची पाहणी केली. व
gfd


सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.) चंद्रभागा (भीमा) नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पूरग्रस्त भागाची पाहणी केली. व्यास नारायण आणि अंबाबाई झोपडपट्टी परिसराला भेट देत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीपात्रात एक लाख क्यूसेक्सहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, रविवारी व्यास नारायण झोपडपट्टी परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील सुमारे १०० कुटुंबांचे उपजिल्हा रुग्णालयासमोरील रायगड भवन येथे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे आणि मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.

चंद्रभागा नदीच्या वाढत्या पाणीपातळीचा विचार करून सखल भागातील नागरिकांचे वेळेत स्थलांतर करण्याचे निर्देश आमदार आवताडे यांनी महसूल, नगर परिषद, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यकतेनुसार सुरक्षितस्थळी स्थलांतरास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande