पिंपरी-चिंचवड प्रारूप विकास आराखडा २०२६ वर हरकती-सूचना नोंदवण्याचे आवाहन
पिंपरी, 03 ऑगस्ट (हिं.स.)पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रारूप विकास आराखडा २०२६ संदर्भात नागरिकांनी सुनावणी प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या हरकती व सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केले आहे. नागरिकांच्या सहभागातून शहराचा विकास आराख
PCMC


पिंपरी, 03 ऑगस्ट (हिं.स.)पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रारूप विकास आराखडा २०२६ संदर्भात नागरिकांनी सुनावणी प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या हरकती व सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केले आहे. नागरिकांच्या सहभागातून शहराचा विकास आराखडा अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक होणार असल्याचे स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले. महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा १५ मे २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यावरील हरकती आणि सूचनांवर ऑगस्ट ते डिसेंबर २०२६ या कालावधीत सुनावण्या होणार आहेत. या प्रक्रियेत नागरिकांनी रचनात्मक सूचना मांडून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. १९८२ मध्ये स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे क्षेत्रफळ ८६ चौरस किलोमीटरवरून सुमारे १७६ चौरस किलोमीटरपर्यंत वाढले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि लोकसंख्येचा वाढता ताण लक्षात घेऊन पुढील २० वर्षांचा विचार करून हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात निवासी, व्यापारी, औद्योगिक, शैक्षणिक, सार्वजनिक आणि हरित क्षेत्रांचे नियोजन करण्यात आले असून, रस्ते, जलपुरवठा, जलनिस्सारण, सार्वजनिक वाहतूक, उद्याने, क्रीडांगणे, आरोग्य सुविधा, पर्यावरण संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक जागांचाही समावेश करण्यात आला आहे. महापालिकेच्या मते, नियोजनबद्ध विकासामुळे वाहतूक कोंडी कमी होणे, सार्वजनिक सुविधा सक्षम होणे, पर्यावरणाचे संरक्षण, रोजगारनिर्मिती आणि शहराचा शाश्वत विकास साधण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सुनावणी प्रक्रियेत सहभागी होऊन शहराच्या भविष्यासाठी आपले मत नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande