बीड येथे गोमांस विक्रीवर पोलिसांची कारवाई
बीड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। बीड शहरातील पेठ बीड हद्दीत गोमांस विक्रीवर पोलिसांची कारवाई, पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करून गोमांस विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी पेठ बीड पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल
पोलीस कारवाई


बीड, 03 ऑगस्ट (हिं.स.)।

बीड शहरातील पेठ बीड हद्दीत गोमांस विक्रीवर पोलिसांची कारवाई, पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करून गोमांस विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी पेठ बीड पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत 75 किलो गोवंशाचे मांस, लोखंडी सत्तूर, चाकू व वजनकाटा असा एकूण 15 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अंमलदार शिवाजी एकनाथ राख (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी म्हणून आवेज पाशा कुरेशी (वय 31) व खालेद कट्टु कुरेशी (वय 45, दोघे रा. कुरेशी मोहल्ला, मोमिनपुरा, बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande