रक्षाबंधनासाठी पुणे टपाल विभागाचा ‘वनस्टॉप राखी सोल्यूशन’ उपक्रम सुरू
पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.)। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या नात्याला अधिक बळ देण्यासाठी पुणे टपाल क्षेत्राने ''वनस्टॉप राखी सोल्यूशन'' हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत देशभरासह परदेशातही राखी, भेटवस्तू आणि शुभेच
रक्षाबंधनासाठी पुणे टपाल विभागाचा ‘वनस्टॉप राखी सोल्यूशन’ उपक्रम सुरू


पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.)। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या नात्याला अधिक बळ देण्यासाठी पुणे टपाल क्षेत्राने 'वनस्टॉप राखी सोल्यूशन' हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत देशभरासह परदेशातही राखी, भेटवस्तू आणि शुभेच्छा सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने पाठविण्यासाठी सर्व सुविधा पोस्ट ऑफिसमध्ये एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

रक्षाबंधनाच्या काळात राखी आणि भेटवस्तू वेळेत पोहोचाव्यात, यासाठी टपाल विभागाने विशेष राखी लिफाफे, सुरक्षित पॅकिंग, स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा तसेच ग्राहकाभिमुख विविध सुविधा सुरू केल्या आहेत. त्यामुळे देशात किंवा परदेशात राहणाऱ्या भावंडांना राखी पाठविणे अधिक सुलभ आणि सुरक्षित झाले आहे.

परदेशात राखी पाठविणाऱ्या ग्राहकांसाठी मोफत पार्सल पिकअप सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता भासणार नाही. या सुविधेबाबत अधिक माहितीसाठी संदीप बटवाल (७०२८००७२३४), साई पाटील (९६७३१६७१७८), ज्ञानेश्वर अंबुरे (९८३४४८२१०५) आणि लहू लोहोकरे (९४०४९६३०८१) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये राखी पाठविण्यापासून ते भेटवस्तू, खाऊ आणि इतर पार्सल पाठविण्यापर्यंतच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे. या विशेष उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्टमास्टर जनरल प्रीती अग्रवाल यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande