संत सहवासाने जीवनाला मिळते योग्य दिशा : प्रा. डॉ. अश्विनी जोग
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। संतांचा क्षणभराचा सहवासही माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देणारा ठरतो. संतकृपेचा महिमा मोठा असून अंतःकरणात ईश्वरभक्तीची ओढ असणाऱ्यांचे जीवन खऱ्या अर्थाने धन्य होते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अश्विनी जोग यांनी केले. श्री संत
fgdf


सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)।

संतांचा क्षणभराचा सहवासही माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देणारा ठरतो. संतकृपेचा महिमा मोठा असून अंतःकरणात ईश्वरभक्तीची ओढ असणाऱ्यांचे जीवन खऱ्या अर्थाने धन्य होते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अश्विनी जोग यांनी केले. श्री संत साहित्य सेवा संघातर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

सात रस्ता येथील ज्ञानप्रबोधिनीच्या चैतन्य भुवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दत्तस्वरूप आप्पाबाबा रुईभर महाराज, शिवानंद दसाडे, रोहन उपळेकर आणि श्री संत साहित्य सेवा संघाचे अध्यक्ष सु. स. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी 'संतसेवा सातत्यनिष्ठा सन्मानार्थ सांगाती पुरस्कार' (द्वितीय वर्ष) शिवानंद दसाडे यांना, तर 'श्री संत साहित्य सेवा पुरुषोत्तम पुरस्कार' (सोळावे वर्ष) रोहन उपळेकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, हार, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि प्रत्येकी ११ हजार रुपयांच्या सन्माननिधीचे होते.

प्रा. डॉ. जोग यांनी आपल्या भाषणात संतसाहित्याचे महत्त्व अधोरेखित करत रोहन उपळेकर यांनी गुरुसेवा, संतसाहित्याचा अभ्यास आणि त्याच्या प्रसारासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी पुरस्कारार्थी रोहन उपळेकर, शिवानंद दसाडे तसेच अध्यक्ष सु. स. देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात डॉ. अपर्णा कल्याणकर लिखित 'सद्गुरू श्रीमाणिकप्रभू', विठ्ठल जोशी लिखित 'स्वानंद – स्व. डॉ. रा. ल. जोशी (अण्णा) यांचे जीवनचरित्र' आणि दा. का. थावरे संपादित 'ज्ञानदेवांची गुरुभक्ती' (द्वितीय आवृत्ती) या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी संघाचे कोषाध्यक्ष रमेश विश्वरूपे, सचिव डॉ. गणेश सांगलीकर, विश्वस्त समिती सदस्य डॉ. माधवी रायते, डॉ. अपर्णा कल्याणकर, ज्ञानेश थावरे, प्रा. मनोज कुलकर्णी, प्रमोद कामतकर, संजीव कुसुरकर, सतीश पोफळे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande