नांदेड महापालिकेत “क्रांतीसिंह नाना पाटील” यांना अभिवादन
नांदेड, 03 ऑगस्ट (हिं.स.)।भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते, प्रतिसरकारचे संस्थापक आणि थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त दि.०३ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्य
अ


नांदेड, 03 ऑगस्ट (हिं.स.)।भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते, प्रतिसरकारचे संस्थापक आणि थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त दि.०३ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे ०३ ऑगस्ट हा भारतीय अवयवदान दिन म्हणुन साजरा करण्यात येत असल्याने यावेळी अवयवदानाच्या प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

क्रांतीसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अतुलनीय आणि झुंझार स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक व समाजसुधारक होते. ब्रिटिश राजवटीला समांतर अशी 'प्रतिसरकार' यंत्रणा यशस्वीपणे राबवून त्यांनी सातारा-सांगली भागात इंग्रज सत्तेला मोठा हादरा दिला होता. गोरगरीब, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा हाच क्रांतीचा आणि समाजसेवेचा वारसा आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.याप्रसंगी महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, उपायुक्त गंगाधर ईरलोड, सहाय्यक आयुक्त मनीषा नरसाळे, मालमत्ता व्यवस्थापक पद्माकर कावळे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, स्विय सहाय्यक महेश आसणे, वरिष्ठ लिपीक शुभांगी चौधरी, प्रदिप फुलारी, सोमेश्वर तांबोळी यांच्यासह इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande