
लातूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। थकबाकीदार कर्जदाराला दोन लाख पर्यतचे कर्ज माफ केले त्याचप्रमाणे चालू बाकीदार कर्जदारांना दोन लाख रुपये प्रात्साहन रक्कम द्यावी अशा प्रकारची मागणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व आमदार विक्रम काळे यांना लातूर जिल्ह्यातील चेअरमनच्या वतीने निवेदन करुन मागणी.
थकबाकीदार कर्जदारांचे दोन लाख रुपया पर्यतचै कर्ज माफ केले त्याबद्दल सरकारचे अभिनंदन.चालू बाकीदार कर्जदाराने चेअरमनच्या हाकेला ओ देत पोटाला चिमटा देवून कर्जाच्या रक्कमेची दरवर्षी वेळेवर परत फेड केली.त्यांना प्रोत्साहन पर लाभ म्ळणुन शासनाने ५०,००० हजार रुपये देण्याचे जाहीर केले हे चालूबाकी कर्जदार शेतकर्यांवर अन्याय आहे. चालू बाकी कर्जदार शेतकरी आता चेअरमनला म्हणत आहेत आम्ही कर्ज खाते चालू बाकी करुन गुन्हा केला काय ? जर आम्हाला दोन लाख रुपया पर्यंत प्रोत्साहन लाभ दिला नाही तर जो पर्यंत कर्ज माफी होत नाही तो पर्यंत आम्ही कर्जाचा भरणा करणार नाही ,गावात सोसायटी राहिल ना राहील अथवा आम्हाला कर्ज देणारी बँक उठली तर बेहत्तर.कर्ज माफी करताना सरकार थकबाकी,चालू बाकी असा भेदभाव कशासाठी करत आहे.अशा प्रकारे चैअरमनला बोलत असल्याने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची लातूर जिल्ह्यातील चेअरमननी भेट घेवून चालूबाकीदाराच्या माणसिकते विषयी गार्हाने सांगीतले .
गटसचिवांना वेतन हे सोसायटीच्या उत्पन्नातून दिले जाते ,यापुर्वी गटसचिवांना वेतन कमी होते त्यामुळे त्यांचे वेतन देताना चैअरमनला कोणतीही अडचण येत नव्हती ,गटसचिवांचे वेतन सोसायटी मार्फत होत असताना चेअरमनला विश्वात न घेता परस्पर वेतन वाढवले अनेक सोसायटीची परिस्थिती वेतन देण्याईतपत नाही तरी त्यांच्या सोसायटी नावे टाकून वेतन देण्याचे सरकारने ठरवले असे केले तर सोसायटींचे अस्तित्वच धोक्यात येवून ग्रामपातळी शेतकर्यांना पत पुरवठा करणारी सोसायटी कर्जात बुडून जाण्याची भिती चेअरमनी व्यक्त करुन गटसचिवांचा पगारीचा भार सोसायटीवर न टकाता गटसचिवांचे वेतन सरकार मार्फतच करण्यात यावे अशा दोन प्रमुख मागण्या घेवून लातूर जिल्ह्यातील चेअरमनच्या शिष्टमंडळाने सहकार मंत्र्यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी चेअरमन तात्यासाहेब पालकर ,चेअरमन राजकुमार सोमवंशी,चेअरमन विरसेन भोसले यांच्यासह चेअरमन उपस्थित होते.
चेअरमनच्या मागणीचा सकारात्मक विचार करुन सरकारकडे याविषयीचा पाठपुरावा अशा प्रकारे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व आमदार विक्रम काळे यांनी चेअरमनच्या शिष्टमंडळला सांगीतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis