SIR अंतर्गत नांदेड दक्षिण मतदारसंघाचे 99 टक्के काम पूर्ण ; प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी अंतिम टप्प्यात
नांदेड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ‘विशेष सखोल पुनर्निरक्षण’ (Special Intensive Revision-SIR) मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून आज अखेर 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर
अ


नांदेड, 03 ऑगस्ट (हिं.स.)।

87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ‘विशेष सखोल पुनर्निरक्षण’ (Special Intensive Revision-SIR) मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून आज अखेर 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित केवळ 1,847 मतदारांचे काम शिल्लक असून येत्या तीन दिवसांत 100 टक्के काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर आज (3 ऑगस्ट) उपविभागीय अधिकारी कार्यालय, नांदेड येथे विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व बीएलए-1 यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत गणना पत्रांचे वाटप, बीएलओंकडे प्राप्त झालेले व डिजिटायझेशन झालेले फॉर्म, ‘अनकलेक्टेबल’ (मयत, स्थलांतरित, गैरहजर, दुबार इ.) म्हणून नोंद झालेल्या मतदारांची माहिती तसेच प्रस्तावित नवीन मतदान केंद्रांची मतदान केंद्रनिहाय यादी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली.

87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व 312 मतदान भागांमध्ये गणना पत्रांचे 100 टक्के वाटप पूर्ण झाले असून डिजिटायझेशनचे 78 टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण प्रक्रियेत 99 टक्के प्रगती झाली असून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

डॉ. खल्लाळ यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आवाहन केले की, ‘अनकलेक्टेबल’ म्हणून नोंद झालेल्या मतदारांचे गणना पत्र संबंधित बीएलओंकडे जमा करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्या मतदारांनी विहित मुदतीत गणना पत्र सादर केले नाही किंवा ज्यांचे फॉर्म ‘अनकलेक्टेबल’ म्हणून नोंदविण्यात आले आहेत, अशा मतदारांची नावे 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाहीत. अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक पुरावे सादर करावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष सखोल पुनर्निरक्षण (SIR) मोहिमेतील अवघड वाटणारे काम बीएलओ, पर्यवेक्षक, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच राजकीय पक्षांचे बीएलए आणि प्रतिनिधी यांच्या समन्वयातून यशस्वीरीत्या पूर्णत्वाकडे जात असल्याचे सांगून डॉ. खल्लाळ यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande