
बीड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनील रेवडकर यांचा न्यू हायस्कूल थर्मल परळी वैजनाथ तसेच नवीन प्राथमिक शाळा थर्मल परळी वैजनाथ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर कर्मचारी संघटनेची राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा उत्साहात पार पडली. या सभेला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हिरेमठ (मुरूम, धाराशिव) तसेच प्रमुख संघटना सल्लागार बामणे (अंबेजोगाई) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सभेत सुनील रेवडकर यांचे यापूर्वीचे कार्य पाहता त्यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर परळी वैजनाथ येथे आयोजित सत्कार समारंभात न्यू हायस्कूलचे पर्यवेक्षक सतीश शहापुरे, नवीन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण वाकडे, ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब मुंडे तसेच दोन्ही शाळांतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सुनील रेवडकर यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis