
अमरावती, 03 ऑगस्ट (हिं.स.) :
माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो केवळ शरीर धारण करतो. मात्र, मृत्यूनंतर ते शरीर जरी सुटले तरी तो आपल्या मागे आपले नाव सोडून जातो. लोक म्हणतात नावात काय ठेवले आहे, पण मी सांगतो की मृत्यूनंतर नावातच सर्वकाही असते ! आपल्या कर्म, समर्पण आणि कर्तृत्वाच्या बळावर आपले विचार जनमानसापर्यंत पोहोचवणारे स्व. सोमेश्वर पुसतकर हे अत्यंत सुसंस्कृत नेते होते, ज्यांचे नाव आता एका अमर गाथेत रूपांतरित झाले आहे, असे उद्गार मराठी विद्यापीठाचे कुलगुरू अविनाश आवळगावकर यांनी काढले.स्थानिक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या (हव्याप्रम) स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृहात रविवारी स्व. सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतीप्रत्यर्थ लोक फाउंडेशन,फाउंडेशन, कृषी विकास प्रतिष्ठान (नागपूर) आणि सोमेश्वर पुसतकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व्या लोकगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष शिवा काळे, सचिव प्रतीक पाथरे यांच्यासह संपूर्ण टीमला मान्यवरांच्या हस्ते १ लाख रुपये नकद, सन्मानपत्र आणिस्मृतीचिन्ह देऊन 'सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व वनराईचे विश्वस्त, माजी आमदार गिरीश गांधी हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीराम काळे, ज्येष्ठपत्रकार बाळासाहेब कुलकर्णी, माजी महापौर तथा मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.चांदूर बाजार येथील शिवा काळे यांनी स्थापन केलेल्या 'स्वराज्य सेवा प्रतिष्ठान' या संस्थेने अमरावती व विदर्भभरात उल्लेखनीय सामाजिक व ऐतिहासिक कार्य केले आहे. मेळघाटमधील ऐतिहासिक गावीलगड किल्ल्यापासून नरनाळा, माहूर, लासूर, रिद्धपूर, कारंजा लाड, रामटेक, कुवारा भीमसेन, नगरधन, आमनेर अशा विविध ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन केले आहे
ऐतिहासिक शोध मोहिमाः भोरकपयेथील ३० हजार वर्षे जुनी रॉक पेंटिंग, गायमुखची अश्मयुगीन चित्रे, सालबडीर्ची पांडव लेणी व पांडव कचेरीचा शोध, खटकाली येथील राणी महाल शोध मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण. महिमापूरची यादवकालीन सात मजली विहीर, रिद्धपूरची सास-बहू विहीर, अचलपूरची सुलतान गढी व तळेगाव दशासर थील विहिरींचे संवर्धन त्यांच्या टीमने केले आहे.
संवादाला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्वः बाळासाहेब कुलकर्णीज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी यांनी सांगितले की, सोमेश्वर पुसतकर यांनी नेहमी वादापेक्षा संवादाची गरज अधोरेखित केली. राजकीयकिंवासामाजिक जीवनात पराभवझाला तरीते कधीपराभूतझाले नाहीत, त्यांनीहार मानली नाही. त्यांनी सोडलेले विचारांचे कार्य आज त्यांच्या नावासारखेच अजरामर झाले आहे.
परकोट संरक्षणासाठीही पुढाकार घ्यावाः विलास इंगोले
माजी महापौर विलास इंगोले यांनी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या कायाचें कौतुक करतानाच अमरावती शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या 'परकोट' या वारशाचे जतनवसंवर्धन करण्यासाठीही प्रतिष्ठानने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सोमेश्वर पुसतकर यांच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, पुसतकर हे जमिनीवरचे अष्टपैलू कार्यकर्ते होते. ते कसे जगले यापेक्षा त्यांचे कार्य किती लोकांच्या हिताचे ठरले हे महत्त्वाचे आहे. त्यांचा मुलगा रेवन पुसतकर हा देखील भविष्यात वडिलांचे नाव उज्ज्वल करेल, असाविश्वास त्यांनी व्यक्त केला.
इतिहास आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालाः गिरीश गांधी
अध्यक्षीय भाषणात गिरीश गांधी यांनी पुरस्कार प्राप्त संस्थेचे अभिनंदन केले. तेम्हणाले, आयोजकांनी आतापर्यंत ३ व्यक्तींनाव ६ संस्थांना या पुरस्काराने गौरवले आहे. यंदा ज्या युवा संस्थेला पुरस्कार दिला आहे, ती संस्था आपल्या इतिहासाला भविष्याशी जोडण्याचे महान कार्य करत आहे. इतिहास समजून घेणे उत्तम आहेच, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य आणि तंत्रज्ञान आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडल्यास अधिक मोठा बदल घडू शकतो. युद्ध आणि संरक्षणाची भाषा आता बदलली आहे, हे इराण-इस्रायल युद्धाने सिद्ध केले आहे.
त्यांनी सुचवले की, अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक गावीलगड किल्ल्याच्या पुनर्निमार्णासाठी उरफ फंडाचा वापर करून नियोजनबद्ध आराखडा तयार केला पाहिजे. आज पैशांची कमतरता नाही; गरज आहे ती इच्छाशक्तीची आणि नियोजनाची. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किल्ले पुनरुज्जीवित केले तर देशपातळीवर एक नवा आदर्श निर्माण होईल आणि यातूनच करोडो मावळे घडतील.या सोहळ्याचे प्रास्ताविक अविनाश पांडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन वैभव दलाल यांनी मानले. या कार्यक्रमाला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, अॅड. प्रशांत देशपांडे, डॉ. सुभाष गवई, वृषाली पुसतकर, रेवन पुसतकर यांच्यासह नागरिक, इतिहासप्रेमी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी