
बीड, 03 ऑगस्ट (हिं.स.)संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी महेश केदार यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी आरोपीच्या वकिलांनी वेळ मागितला. कोर्टाने पुढील तारीख 5 ऑगस्ट दिली आहे. निशाणी क्रमांक 211, 212 आणि 213 या अर्जामध्ये एकत्रित दोषारोप पत्र करता येत नाहीत. असा अर्ज आहे.. या संदर्भात आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज केला ते प्रकरण प्रलंबित आहे म्हणून कोर्टाने या तीन अर्ज तात्पुरत्या स्वरूपात आहे त्या परिस्थितीत ठेवले आहेत. अशी माहिती सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis