नांदेड : मुख्य वस्तीत अनेक वर्षांपासून विनापरवाना लाकूड कटाई
नांदेड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। तालुक्यातील बारड येथील मुख्य वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून विनापरवाना लाकूड कटाई मशीनचा व्यवसाय सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मशीनच्या कर्णकर्कश आवाजामुळे ओम शांतिनगर वस्तीतील नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त
नांदेड : मुख्य वस्तीत अनेक वर्षांपासून विनापरवाना लाकूड कटाई


नांदेड, 03 ऑगस्ट (हिं.स.)।

तालुक्यातील बारड येथील मुख्य वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून विनापरवाना लाकूड कटाई मशीनचा व्यवसाय सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मशीनच्या कर्णकर्कश आवाजामुळे ओम शांतिनगर वस्तीतील नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. वनविभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत विनापरवाना लाकूड कटाई मशीनमुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीची दखल घेऊन संबंधित व्यावसायिकास नोटीस बजावण्यात आली आहे. नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे,

व्यावसायिकास अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा भरवस्तीत हा व्यवसाय सुरू झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. कारवाई न झाल्यास नागरिकांच्या वतीने जनआंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande