पुणे : तुकाराम मुंढेंवर ८ ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रम
पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, धाडसी प्रशासकीय निर्णयांचा आणि जनहितासाठी केलेल्या कार्याचा उलगडा करणारी विशेष प्रकट मुलाखत शनिवार, ८ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. भव
Tukaram


पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, धाडसी प्रशासकीय निर्णयांचा आणि जनहितासाठी केलेल्या कार्याचा उलगडा करणारी विशेष प्रकट मुलाखत शनिवार, ८ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. भविष्यवेध – संवाद भविष्याचा या उपक्रमांतर्गत अनस्टॉपेबल तुकाराम या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या संवादात तुकाराम मुंढे आपल्या बालपणापासून भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) झालेल्या प्रवासापर्यंतचे अनुभव उलगडणार आहेत. विविध पदांवर काम करताना घेतलेले कठोर निर्णय, आलेली आव्हाने, पारदर्शक प्रशासनाची भूमिका आणि समाजहितासाठी राबविलेल्या उपक्रमांबाबत ते उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधतील.या विशेष मुलाखतीचे सूत्रसंचालन आणि संवाद प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप करणार असून, त्यांच्या प्रश्नांमधून तुकाराम मुंढे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.पुणे लोकल कनेक्ट आणि माय जनसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, अपेक्षित गर्दी लक्षात घेता आयोजकांनी इच्छुकांनी पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. पूर्वनोंदणीसाठी आयोजक अमित रुके आणि विरेश आंधळकर यांनी नोंदणी पोर्टलला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande