जळगावमध्ये कारमधून व्यापाऱ्याची १२.५० लाखांची रोकड लंपास
जळगाव, 04 ऑगस्ट (हिं.स.) | शहरात कारमधून ऑईल लीक होत असल्याची बतावणी करून फळ व्यापाऱ्याची १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना रात्री गणपती नगर परिसरात घडली. या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकर
जळगावमध्ये कारमधून व्यापाऱ्याची १२.५० लाखांची रोकड लंपास


जळगाव, 04 ऑगस्ट (हिं.स.) | शहरात कारमधून ऑईल लीक होत असल्याची बतावणी करून फळ व्यापाऱ्याची १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना रात्री गणपती नगर परिसरात घडली. या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ व्यापारी अनिल ओमप्रकाश मंधान हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून कारने घरी निघाले होते. त्यांच्या कारच्या मागील सीटवर दिवसाच्या व्यवहारातील १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग ठेवलेली होती.

दरम्यान, काही संशयितांनी त्यांच्या कारचा पाठलाग केला. गणपती नगर परिसरात पोहोचल्यानंतर त्यांनी मंधान यांना “गाडीतून ऑईल लीक होत आहे” असे सांगितले. त्यामुळे त्यांनी तातडीने कार थांबवून खाली उतरून वाहनाची पाहणी सुरू केली. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कारच्या मागील सीटवरील रोकड असलेली बॅग लंपास केली आणि काही क्षणांत घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande