दहा वर्षांपासून फरार असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक
लातूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर जिल्हा पोलीस दलाने फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सुमारे दहा वर्षांपासून फरार असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला लातूर पोलिसांच्या विशेष पथकाने अचूक माहितीच्या आधारे ताब्यात घेतल
पोलीस कारवाई


लातूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर जिल्हा पोलीस दलाने फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सुमारे दहा वर्षांपासून फरार असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला लातूर पोलिसांच्या विशेष पथकाने अचूक माहितीच्या आधारे ताब्यात घेतले आहे.

पोलीस ठाणे एमआयडीसी, लातूर येथे गुन्हा क्र. 38/2016 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 471 व 34 अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी

1) सुग्रीव गिरजप्पा बंडगर (वय 39 वर्षे, रा. भातांबी, ता. तुळजापूर)

हा 2016 पासून फरार होता. न्यायालयात वारंवार अनुपस्थित राहत असल्याने त्याच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 299 अन्वये कार्यवाही करण्यात आली होती.

तपासात उघड झाल्यानुसार, फिर्यादी हे एका वित्तीय संस्थेमध्ये शाखाधिकारी म्हणून कार्यरत असताना आरोपींनी बनावट कागदपत्रे व खोटी माहिती सादर करून वाहन कर्ज मंजूर करून घेतले. वाहन तारणाशी संबंधित कागदपत्रांमध्ये बनावटपणा करून वित्तीय संस्थेची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही बाब उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक सातत्याने कार्यरत असून आरोपी आपल्या मूळ गावाच्या परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पथकाने तात्काळ सापळा रचला व आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, विनोद चलवाड, श्रीनिवास जांभळे यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande